संकेश्वर (महंमद मोमीन) : राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, राष्ट्रप्रशस्ती प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक डॉ. शिवनगौडा बाळगौडा पाटील (वय ८१) यांचे आज सकाळी ६.१० वाजता संकेश्वर बसवान गल्लीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते कवी, लेखक आणि उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना एकलव्य प्रशस्ती, उत्तम शिक्षक राज्य प्रशस्ती, कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ती, एन.सी.आर.टी. प्रशस्ती शिक्षण संशोधन प्रशस्ती, उत्तम शिक्षक राष्ट्रप्रशस्तीने गौरविण्यात आले होते. ते कुडलसंगम बसवधर्मपीठाचे गणनायक होते. डाॅ. शि. बा. पाटील यांचे पार्थिव दर्शनासाठी संकेश्वर विश्वगुरु सभामंडपात ठेवण्यात आले होते. डाॅ. शि. बा. पाटील यांनी देहदान केलेले असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर कुडलसंगमचे श्री बसवप्रकाश स्वामीजी, नगरसेवक संजय शिरकोळी, राष्ट्रीय बसव दलाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थिती अंत्यसंस्कार पूजाविधी करुन त्यांचे मृतदेह बेळगांव के.एल. ई. इस्पितळाला सुपुर्द करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Check Also
संकेश्वर बस स्थानकात अडीच तोळ्याचे दागिने लंपास
Spread the love संकेश्वर : येथील बस स्थानकात बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील अडीच …