Tuesday , September 17 2024
Breaking News

अपघातग्रस्त मेंढपाळांना मदतीचा हात

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) :अमणगी-मुगळी रस्त्यावर टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडल्याने मेंढपाळ लगमण्णा हालप्पा हेगडे, हालप्पा सिध्दप्पा हेगडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ५४ बकऱ्या ठार झाल्याने मेंढपाळांचे अदमासे सहा लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूटचे बेळगांव जिल्हा अध्यक्ष शंकर हालप्पा हेगडे अंमणगी पुढे सरसावलेले दिसत आहेत. त्यांनी टिप्पर अपघातात बकऱ्या गमावलेल्या मेंढपाळ लगमण्णा हेगडे यांना पाच हजार रुपये, हालप्पा हेगडे यांना पाच हजार रुपयांंची तातडीची मदत दिली आहे. पत्रकारांशी बोलताना शंकर हेगडे (अमणगी) म्हणाले, अमणगी-मुगळी रस्त्यावर टिप्परने ५४ बकऱ्यांना चिरडले आहे. टिप्पर चालकाच्या निष्काळजीपणाने भरवेगात वाहन चालविल्याने हा अपघात घडला आहे. अपघातात ५४ बकरी ठार झालेल्या मेंढपाळांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूट बेळगांव पुढाकार घेतलेले आहे. ठार झालेल्या प्रत्येक बकरीसाठी शासनाकडून ५ हजार रुपयांची मदत मिळवून दिली जाणार आहे. माजी तालुका पंचायत सदस्या श्रीमती सी. एस. मगदूम यांनी दहा हजार रुपयांची मदत दिली आहे. आमची संघटना मेंढपाळ लगमण्णा हेगडे, हालप्पा हेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूटचे संचालक सिद्राम हेगडे, प्रशांत पाटील, मलप्पा राजापूरे, अप्पासाहेब तंडन, सुरेश हेगडे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *