
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कमतनूर वेस येथील राहुल भोपळे सर्कल येथे कारगिल युध्दातील शहीद जवानांना तसेच संकेश्वरचे शहीद जवान राहुल भोपळे, सतीश सुर्यवंशी यांना शतशः नमन करून कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला. युवानेते प्रदीप माणगांवी यांनी शहीद जवान स्मारकाची पूजा करुन अभिवादन केले. नगरसेवक सचिन भोपळे, नेताजी आगम यांनी शहीद जवानांना शतशः नमन करुन देशासाठी प्राण त्याग केलेल्या वीर जवानांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित लोकांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी सुभाष चाळके, रुपेश पागे, दयानंद मत्तीकोप, गुरु थोरवत उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta