
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित एस.एस.के पाटील सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. आदित्य नार्वेकर या विद्यार्थ्यांने ९९ % गुण मिळवून राज्यात तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचं नाव मोठं करणारा ठरला आहे. त्याने विज्ञान आणि गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. वरदा व्हनमनी ९६ % गुण मिळवून द्वितीय तर चैत्रा केस्ती हिने ९४.२ गुण संपादन करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कु.पंचमी शेंडुरी कन्नड भाषेत १०० पैकी १०० गुण मिळविणारी विद्यार्थिनी ठरली आहे.खुशी बायण्णावर (९३.८), अमोघवर्ष नेसरी (९३.६), अवंती चाळके (९३.६), सानिया नाईकवाडी (९३), मेहक रावळ (९२.६), पंचमी शेंडुरी (९२.४), स्नेहा नडगदल्ली (९२.४), राधिका देसाई (९१ %) गुण मिळवून शाळेचं नाव मोठं केल्याचे प्राचार्य मारुती कामत यांनी सांगितले. गुणवत्ता यादीतील तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. जी. एस..इंडी संचालक बसनगौडा पाटील, सचिव जी. सी. कोटगी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta