Tuesday , September 17 2024
Breaking News

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हवे : रमेश कत्ती

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : मुस्लिम बांधवांनी मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी मुलांना शाळेत पाठवायला हवे असल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते सरकारी उर्दू कन्नड प्रौढ शाळेच्या तीन नूतन खोल्यांच्या उदघाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, रमेश कत्ती यांच्या हस्ते फित सोडून शाळा खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थान सरकारी उर्दू कन्नड प्रौढ शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अकील नदाफ यांनी भूषविले होते. रमेश कत्ती पुढे म्हणाले, केंद्र सरकारने आता सरकारी शाळेतील मुलांच्या दुपारच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला आहे. कारण सरकारने केलेल्या एक सर्वेक्षणात शालेय मुलांना पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता शालेय मुलांना दुपारच्या जेवणात गोड चक्की, केळी आणि अंडी दिली जाणार आहेत. सरकार मुलांच्या शिक्षणावर जादा लक्ष केंद्रित करीत आहे. कारण भारताचे उज्ज्वल भविष्य मुलांच्या शिक्षणतून घडणार आहे.आंमचे लाडके वडील बंधू राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सर्व समाजाला बरोबरीने घेऊन जाण्याचे कार्य करतांना अल्पसंख्याक मुलांच्या शिक्षणाला जादा प्राधान्य दिले आहे.त्यांनी हुक्केरी तालुक्यात सरकारी उर्दू प्राथमिक शाळा २८ आणि ५ प्रौढ शाळा प्रारंभ करुन दाखविल्या आहेत. कर्नाटकात हुक्केरी तालुका पाच उर्दू प्रौढ शाळा असणारा एकमेव तालुका ठरला आहे. उर्द शाळेतील पटसंख्या केवळ १२०० इतकीच राहिली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात अद्याप शिक्षणाविषयी उदासिनता दिसून येत आहे. हे चित्र समाज बांधवांनी बदलायला हवे आहे. सरकार मुलांच्या शिक्षणासाठी सर्व सवलती पुरवित आहे. त्याचा सदुपयोग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जातीयता संपुष्टात येणार….
आज देशात जातीयवाद फोफावला असला तरी मंत्री उमेश कत्ती, रमेश कत्ती हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य करीत आहेत. आज देशात असणारे जातीयतेचे चित्र येत्या २० वर्षांत निश्चितच बदललेले दिसणार आहे. त्यावेळी दोनच जाती अस्तित्वात राहणार आहेत. एक शिक्षित आणि दुसरं अशिक्षित त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, आर. एम. पाटील, हाजी अल्लाउद्दीन कलावंत, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, ॲड. प्रमोद होसमनी, विवेक क्वळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, हारुण मुल्ला गंगाराम भूसगोळ रोहण नेसरी, संदिप दवडते, इलियास मुल्ला, युवानेते इम्रान नालबंद, असिफ गजेंद्रगड, उस्मान सौदागर, शिराज शेख, अमिन कुमनाळी, अमित गस्ती, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला अभियंता आर. बी. गडाद शाळा खोल्यांचे ठेकेदार मलप्पा अंकली, शिक्षण विभागाचे रवि शेट्टीमनी, शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. खडकभांवी, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे‌ स्वागत आणि आभार शिक्षक राजू कमते यांनी मानले.

 

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *