Tuesday , March 3 2026
Breaking News

दुऑ मे याद रखना….

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज एका शाळेच्या कार्यक्रमात दुऑ मे याद रखना असे सांगत मुस्लिम समाज बांधवांकडू चक्कं मतयाचना केली आहे. आपल्या भाषणात रमेश कत्ती यांनी समाज बांधवांवर थेट निशाना साधला. ते म्हणाले, मुस्लिम समाजाने आजपावेतो सांगितलेली सर्व कामे मंत्री उमेश कत्तीं आणि आपण करुन दिली आहेत. पण समाज बांधवांचा आशीर्वाद कांहीं आम्हाला मिळेनासा झाला आहे. आम्ही तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा केलेली नसतांना तुमचा आशीर्वाद का नाही? याच प्रश्नाचे उत्तर आंम्हाला मिळेनासे झाले आहे. आमच्याकडून कामे करुन घ्यावयाची आणि मत दुसऱ्याला असा प्रकार चालला आहे.ही गोष्ट नक्कीच चांगली नाहीय. पाच वर्षात एकदाच आम्ही तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा ठेवतो. येथून पुढे तरी दुऑ मे याद रखना भूलना नही, असे त्यांनी सांगितले. उर्दु भाषेतून रमेश कत्ती यांचे सांगणे समाज बांधवांना विचार करण्यास भाग पाडणारे दिसत आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, आर. एम. पाटील, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, नंदू मुडशी, रोहण नेसरी, सचिन भोपळे, हाजी अल्लाउद्दीन, कलावंत इलियास मुल्ला, हारुण मुल्ला, अकील नदाफ, इम्रान नालबंद, असिफ गजेंद्रगड, शिराज शेख, परवेज मुल्ला समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *