
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्था संचलित एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत आझादी का अमृतमहोत्सव
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ अखेर विविध भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जाणारा आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात आज पत्रकारांच्या हस्ते करुन त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारांनी शाळेचे ध्वजारोहण, राष्ट्रपीता महात्मा गांधी प्रतिमेचे पूजन करुन शाळेत पंधरवडाभर साजरा केल्या जाणाऱ्या आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाला चालना दिली. कार्यक्रमाविषयी बोलताना शाळेचे प्राचार्य एम.एस. कामत म्हणाले, आमच्या एस.एस.के. पाटील इंग्रजी माध्यम शाळेत पंधरवडा भर आझादी का अमृतमहोत्सव सोहळा विविध भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्यात स्थानिक स्वतंत्र सैनिकांचे योगदान समजावून देण्याचे कार्य केले जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या देशाची महान संस्कृती परंपरा मुलांनी जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांना पटवून दिले जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात कलाकार, कारागिर तसेच घरेलू उद्योग करणाऱ्या सामान्य लोकांचे देखील योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्या कार्याचा परिचय मुलांना करुन देण्याबरोबर शिक्षण, विज्ञान आणि अन्य क्षेत्रात देशांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी मुलांना समजावून सांगितली जाणार आहे.देशाच्या विकासात नेते मंडळींचे मोठे योगदान राहिले आहे. त्याची माहिती मुलांना करुन देण्याचे कार्य केले जाणार आहे. आपला देश विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला असून देशात अनेकतेत एकता दिसून येते. जात पंत भाषा यापेक्षा आपण सर्वजण भारतीय आहोत याचा सार्थ अभिमान बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमातून पटवून देण्याचे कार्य केले जाणार आहे. शाळेत १ ते १५ ऑगस्ट २०२२ अखेर दररोज आझादी का अमृतमहोत्सव विविध माहितीपूर्ण कार्यक्रमानी साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय मुलींनी परंपरागत पद्धतीने पत्रकारांचे सहर्ष स्वागत केले. आभार शिक्षक संतोष पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta