Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव वाढदिवस भरगच्च कार्यक्रमानी साजरा

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस वृक्षरोपांचे वाटप, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमात फळ वाटपाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द शाखा संकेश्वरच्या सदस्याना वृक्षरोपांचे वाटप संस्थेचे अध्यक्ष रोहण नेसरी, उपाध्यक्ष विरभद्र हेद्दुरशेट्टी आणि संचालकांच्या हस्ते करण्यात आले. सिल्व्हर डेल वृद्धाश्रमातील वृध्दांना फळ, बिस्किटे वाटप करुन वृध्दाश्रमाला तांदूळ देण्यात आले. कुरणातील गोशाळेला पशुआहार तसेच वेंकटेश नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डाॅ. प्रभाकर कोरे यांचे आयुरारोग्य उत्तम राहण्यासाठी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठात अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमात संकेश्वर डॉ. प्रभाकर कोरे सौहार्द सहकारी संस्थेचे चेअरमन रोहण नेसरी, उपाध्यक्ष विरभद्र हेद्दुरशेट्टी, संचालक शंकर रगशेट्टी, शशी गडकरी, डॉ. सचिन वैद्य, अन्य संचालक अभिमानी कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *