Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात पैसा झाला खोटा….

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात दहा रुपयांचे खणखणीत नाणे (क्वाॅईन) चलेणासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांच्या नाणेचे करायचे काय? हा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला दिसत आहे. बाजारात काय बॅंकेत देखील दहा रुपयांचे नाणे स्विकारले जाईनासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांचे नाणे खोटे बनलेले दिसत आहे. संकेश्वरातील किराणा दुकानदार असो भाजी विक्रेते दहा रुपयांचे नाणे कोणीच स्विकारायला तयार नाहीत. संकेश्वरात दहा रुपयांचे क्वाॅईन जवळजवळ चलनातून बंद झालेले दिसत आहे. दुकानदारस दहा रुपयांणे नाणे का स्विकारत नाही? असा प्रश्न केला असता ते सरळ सांगताहेत. दहा रुपयांचे नाणे चालत नाही. संकेश्वरात लगतच्या महाराष्ट्र राज्यातून आलेल्या लोकांची दहा रुपयांच्या नाण्यावरुन वादावादी होताना दिसत आहे.आमच्या येथे दहा रुपयांचे नाणे चालते तर तुम्ही का घेत नाही? या प्रश्नाचे उत्तर तसे निरुत्तरच राहिलेले दिसत आहे.
दहा रुपयांचे नाणे कोसावर चालते..
संकेश्वरच्या हाकेवर महाराष्ट्र राज्याची हद्द सुरू होते. संकेश्वर येथून अगदी हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र राज्यातील नांगनूर गाव आहे. तेथे दहा रुपयांचे नाणे चालते संकेश्वरात का चालत नाही? हेच तर समजेनासे झाले आहे. केंद्र सरकारने विशेष करुन रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांचे नाणे चलनात असल्याचा खुलासा केलेला असला तरी संकेश्वरात मनमानी पद्धतीने दहा रुपयांचे नाणे बाद ठरविले जात आहे. चलनातील पाच रुपयांची नोट देखील अशीच बाद ठरवून गायब झालेली दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *