Monday , April 20 2026
Breaking News

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन : प्रा. सी. वाय. पाटील

Spread the love

बी. के. कॉलेज येथे माजी विद्यार्थी संघटनेची बैठक संपन्न

बेळगांव : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. जीवनात एका नव्या रस्त्याने परीक्रमन करण्यासाठीं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. फुले शाहू आंबेडकर यांनी दिलेला विचार बहुजनांच्या उद्धाराकरिता अखेर पर्यंत घेऊन गेला आहे; तोच वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊन वैचारिक सुदृढ समाज बनविण्यासाठी प्रत्येकानी पुढे कार्य करण्यासाठी एकत्र येऊन जोमाने कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. सी. वाय. पाटील यांनी केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना बेळगांव यांच्या वतीने महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात संदर्भात तसेच महाविद्यालयाचे न्याक मूल्यांकन संदर्भात बैठकीचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि बी. के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील उपस्थित होते.

व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून दमशि मंडळचे सचिव विक्रम एल. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. सी. वाय. पाटील , प्रा डॉ. बी. आय. वसुलकर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. आय. वसुलकर यांनी केले. प्रा. सी. वाय. पाटील, आर. वाय. पाटील, प्रा.डॉ. एस. एन. पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

सूत्रसंचलन प्रा. नारायण पी. तोराळकर व प्रा. तेजस्विनी एम. चौगुले यांनी केले. तर माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी केले.

यावेळी सुरेश बरगावकर, प्राचार्य आनंद पाटील, जी. एस. पाटील, प्रा. डी. टी. पाटील, प्रा डॉ. डी. एन. मिसाळे, प्राचार्य आर. डी. शेलार, प्राचार्य बसवराज कोळूचे, प्रा. अमित सुब्रमण्यम, डी. बी. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. नितिन घोरपडे, प्रा. निलेश शिंदे, अनिल कणबरकर, प्रा. रामभाऊ हुद्दार, प्रा. प्रभाकर हुरुडे, प्रा. महादेव नार्वेकर, के. के पन्हाळकर, मनोहर हुंदरे, शिवजी शिंदे, बी. जी. गाडेकर, ए. व्हि. सुतार, ॲड. ए. आर. पाटील, अनिल पाटील, जी.जी. पाटील तसेच व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक आजी-माजी विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————–

माजी विद्यार्थी व पालक स्नेह मेळावा आणि न्याक मूल्यांकन

द. म. शि. मंडळ संचलित भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगावचे “माजी विद्यार्थी व पालक स्नेहमेळावा आणि न्याक मूल्यांकन” शुक्रवार दिनांक : 05 / ऑगस्ट /2022 रोजी होणार आहे. या मूल्यांकन कार्यक्रमात “माजी विद्यार्थी आणि पालक सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी संवाद एक चिंतन”: असा अनोखा कार्यक्रम दुपारी 2 : 00 वाजता होणार आहे. तरी सर्व माजी विद्यार्थी व पालक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दमशि मंडळ व भाऊराव काकतकर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्री. आर. वाय. पाटील यांनी केलेले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *