Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वरात आठ हजार घरांवर तिरंगा डौलाने फडकणार..

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेत देशाचा अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते.

सभेला उद्देशून बोलताना मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले बेळगांव जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पालिका हर घर तिरंगा अभियानाचे कार्य हाती घेतले आहे. हर घर तिरंगा अभियानात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक अंगणवाडी सेविका, स्वयसहाय्य संघाच्या महिलांचा सहभाग महत्वपूर्ण राहणार आहे. हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी ध्वजसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. येत्या १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस संकेश्वरकरांनी आप आपल्या घरांवर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य करावयाचे आहे. सरकारने संकेश्वर पालिकेकरिता पाच हजार तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.संकेश्वर पालिकेला आणखी तीन हजार तिरंगा ध्वजांची तजवीज करावी लागणार आहे. सरकार घरावर फडकविणेचा तिरंगा ध्वज २५ रुपयांत उपलब्ध करून देणार आहे. तो सर्वांना २५ रुपये देऊन घ्यावा लागणार आहे. अंगणवाडी सेविकांना आपल्या प्रभागातील प्रत्येक घरांवर तिरंगा कसा फडकवायचा यांचे प्रशिक्षण पीई टिचरांकडून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण..
उपनगराध्यक्ष अजित करजगी म्हणाले, देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा हर घर तिरंगा अभियानाने यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. अंगणवाडी सेविकांनी संकेश्वरातील ७५ वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते घरावरील तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य करावे, अशी सूचना केली.
स्वयंसहाय्य संघाच्या महिलांना सभेला कशासाठी बोलाविलात..
नगरसेवक जितेंद्र मरडी म्हणाले स्वयंसहाय्य संघाच्या महिलांनी हर घर तिरंगा अभियानात कोणतं कार्य करावयाचे यांची माहिती पालिकेकडे नसेल तर त्यांना सभेला कशासाठी बोलाविलात असा प्रश्न उपस्थित केला.
सभेला नगरसेवकांची दांडी..
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्यासाठी आज पालिकेने बोलाविलेल्या सभेला नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक जितेंद्र मरडी, सचिन भोपळे हे चारच नगरसेवक उपस्थित होते. सभेला सभापती सुनिल पर्वतराव यांच्यासह २२ नगरसेवकांनी दांडी मारलेली दिसली. त्यामुळे सभेत नगरसेवकांच्या सर्वच खुर्च्या रिकाम्या दिसल्या. सभेला अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्य संघाच्या महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *