
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका भाजप महिला मोर्चा घटकच्या वतीने संकेश्वर पोलिस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, पोलिस कर्मचाऱ्यांना हुक्केरी तालुका महिला मोर्चा घटकच्या उपाध्यक्षा सौ. संगिता के. निलाज, डॉ. सावित्री जयवंत करीगार, भाग्यश्री मोकाशी व अन्य सदस्यांनी परंपरागत पद्धतीने रक्षाबंधन केले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ. संगिता निलाज म्हणाल्या, देशाचं रक्षण करणारा सिमेवरील जवान आणि जनतेच्या रक्षणासाठी झटणारे पोलीस यांच्या कार्याचा अभिमान वाटतो. आमच्या लाडक्या नेत्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महिला मोर्चा घटकच्या वतीने जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम होत आहे. आम्ही पोलिस अधिकारी कर्मचारी यांना रक्षाबंधन करुन त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta