संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे तिरंगा ध्वजाचे वितरण व्यवस्थित करण्यात आलेली नसल्याची तक्रार प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक विनोद नाईक यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात ७५४ घरे आहेत.आपल्याला २२० तिरंगा मात्र देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्व घरांवर तिरंगा कांहीं फडकविता आला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी आर. सी. चौगुला तिरंगा ध्वजाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एकीकडे पालिकेला ८ हजार तिरंगा ध्वज मिळाल्याचे सांगितले जात असताना मुख्याधिकारी त्याचा इन्कार करीत आहेत. पालिकेला पाच हजार अधिकचे तीन हजार तिरंगा हिरण्यकेशी साखर कारखान्यांकडून मिळाले असतील तर तिरंगा गेले कोठे? हेच समजेनासे झाले आहे. गावात सर्वत्र आझादी का अमृतमहोत्सव घरोघरी तिरंगा फडकावून उत्साही वातावरणात साजरा होत असताना आपल्या प्रभागात मात्र तिरंगा अभावी अमृतमहोत्सव सोहळा साजरा होऊ शकलेला नसल्याचे सांगून ते म्हणाले प्रभागातील लोक आंम्हाला तिरंगा का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कत्ती सावकारांची जिलेबी कोठे आहे ….
प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपाच्या नेत्यांनी कत्ती सावकारांचे जिलेबी बाॅक्स सर्वांना पोचते केलेले नाहीत. त्यामुळे लोक कत्ती सावकारांनी जिलेबी कोठे आहे? अशी विचारणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta