संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोंधळी समाजाची सभा नुकतीच सुरेश दवडते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत संकेश्वर गोंधळी समाजाचे अध्यक्ष म्हणून दत्ता दवडते, उपाध्यक्षपदी शंकर काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. समाजाच्या ट्रस्टी म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई गणपती काळे निवडल्या गेल्या आहेत. सेक्रेटरी म्हणून मुरलीधर दवडते, सहसेक्रेटरी रवी तुकाराम दवडते, खजिनदार दिपक सुगते निवडले गेले आहेत. संचालक मंडळात सुरेश दवडते, दिपक दवडते, राजू आडेकर, अनिल काळे, विनायक दवडते, गणेश दवडते, सल्लागार समितीत महादेव दवडते, हरिभाऊ आडेकर, विलास दवडते, संतराम रामू दवडते यांची निवड करण्यात आली आहे. सभेला गोंधळी समाज कमिटीचे सभासद उपस्थित होते. संकेश्वर गोंधळी समाजाच्या नूतन कार्यकारिणीचे समाज बांधवांतून विशेष अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta