Sunday , September 20 2026
Breaking News

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी वंदना पाटील यांची बिनविरोध निवड

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सौ. वंदना अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अभिकारी म्हणून कळसा भंडुरा प्रकल्पाचे कार्य निवार्हक अधिकारी सहाय्यक अभियंता आर. डी. मराठे यांनी काम पाहिले.
गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्ष पद ३० महिन्याच्या कालावधीत पहिल्या टप्प्यात अध्यक्षा म्हणून सौ. अनुराधा निट्टुरकर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी पहिल्या टप्प्यात ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले. त्यांनी आपल्या अध्यक्षा पदाचा राजीनामा दिला.
त्यामुळे नुतन अध्यक्ष पदी बुधवारी दि. १७ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सदस्या रेखा कुंभार यांनी नुतन अध्यक्षाचे नाव सुचीत केले. यावेळी नुतन अध्यक्ष पदी सौ. वंदना अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायतीचे पीडीओ जी. एल. कामकर, माजी अध्यक्षा सौ. अनुराधा निट्टुरकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले, प्रसाद पाटील, अजित पाटील, सदस्या रेखा कुंभार, अन्नपूर्णा बुरूड, ललिता कोलकार, सुनिता सुतार आदी उपस्थित होते.
यावेळी नुतन अध्यक्षा सौ. वंदना अशोक पाटील व मावळत्या अध्यक्षा सौ. अनुराधा निट्टुरकर यांचा ग्राम पंचायतीच्या वतीने शाल, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायतीचे कर्मचारी व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *