
हुक्केरी : केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले होते. या अभियानास बुगटे आलूर वासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. दि. 13 ऑगस्ट रोजी गावातील दत्तमंदिर वरील स्पीकरवरून सकाळी बरोबर 8:00 वाजता राष्ट्रगीत लावण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांनी आपापल्या दारात असलेल्या तिरंग्यासमोर येऊन तिरंग्याला सलामी देत सामूहिक राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीत चालू असताना सर्व नागरिकांनी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवून स्तब्ध उभं राहून राष्ट्रगीत गायले होते. याचप्रमाणे दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सामूहिक वंदेमातरम म्हणून राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला. अत्यंत देशभक्तीपर वातावरणात उत्स्फूर्तपणे बुगटे आलूर येथे ‘हर घर तिरंगा’ हे अभियान साजरे करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta