संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कुमार शौर्य कुलकर्णी, कु.गिरीश केंपदानी यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. त्यांना योग समितीच्या महिला साधकांनी औक्षण करुन भेटवस्तू वस्तू दिल्या. यावेळी योगशिक्षक परशुराम कुरबेट पुष्पराज माने, रावसाहेब करंबळकर, नागराज नाईक,मलप्पा कुरबेट, प्रमिला देसाई, शैलजा जेरे, शिवलिला कुंभार, शारदा केंपदानी, गीतांजली रायकर, मंगल निडसोसी, अंजली मॅडम योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन गीत गायनाने श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta