
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर शाखा मठाचा दासोह महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे झाली दासोह होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाच्या दासोह महोत्सवात भक्तांंचा मोठा सहभाग दिसला. परंपरागत पध्दतीने गुडसी वखार येथे श्री दुरदुंडीश्वर उत्सवमूर्तीची गुडशी परिवारातर्फे पूजा करण्यात आली. तदनंतर श्री दुरदुंडीश्वर उत्सवमूर्तीची गावातील प्रमुख मार्गे सवाद्यसमवेत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात महिलांनी पंचारती ओवाळून उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. व्यापारी वर्गाने उत्सवमूर्तीचे सहर्ष स्वागत केले. मिरवणुकीत परंपरागत पद्धतीने दिवसा पेटती मशाल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अश्वनृत्य पहावयास मिळाले. सुभाष रस्ता येथे आडवी पालखी उत्सव पहावयास मिळाला. मठाजवळ मिरवणूक पोचताच निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रकाश कणगली, डॉ. टी. एस. नेसरी, बाबूराव मरीगुद्दी, किरण नेसरी, सिध्दराम गुडशी, मलप्पा रवदी, दुंडप्पा हंज्यानट्टी, अप्पासाहेब कर्देण्णावर, संतोष काकोळी, मलप्पा मुडशी, बसवराज बागलकोटी, महेश निलाज, गंगाधर पट्टणशेट्टी, सोमशेखर कणगली, युवानेते पवन कत्ती, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, रोहण नेसरी, विजापूरचे असिस्टंट कमिशनर महावीर बोरण्णावर, राजेंद्र बोरगांवी, प्रदीप माणगांवी, ॲड. संतोष नेसरी, अनेक मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रींनी देवदर्शन घेऊन प्रसाद पूजा केले नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. सुनिल पर्वतराव यांच्या निवासस्थानी पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या पादपूजनांने दासोहची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta