
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील श्रीपंत बाळेकुंद्री जन्माष्टमी उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकल जणांच्या सुखशांतीसाठी गुरूवारी श्री दत्त याग महायज्ञ संकल्प करण्यात आला. शुक्रवार दि. १९ रोजी सकाळी श्रींच्या पादुकांना अभिषेक करण्यात आले. प्रेम ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम महिला भजनी मंडळाच्या भजनात पार पडला. रात्री १२ वाजता श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. शनिवार दि २० रोजी पंत भजनी मंडळ यांचेकडून गावातील प्रमुख मार्गे श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजता माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, आनंद शिरकोळी यांच्या हस्ते प्रसाद पूजन करुन महाप्रसाद वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ असंख्य भक्तगणांनी घेतला. सायंकाळी आरतीने उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवात अनेक मान्यवर नागरिक, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी संसुध्दी गल्ली श्री दत्त भक्त मंडळांने विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta