संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. येथील श्री संतसेना नाभिक समाजातर्फे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर नदी गल्लीतील श्री संतसेना मंदिरात मंगळवार दि. २३ रोजी रात्री पेदरवाडी तालुका आजारा येथील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. आज सकाळी श्री संतसेना महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करुन मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. मंदार हावळ, अभिजित कुरणकर, जयप्रकाश सावंत, अविनाश नलवडे, बसवराज बागलकोटी, निलेश जाधव, उमेश मन्नोळीमठ, नाभिक समाजाचे अध्यक्ष विजय माने, उपाध्यक्ष कुमार कदम, शशीकांत शिंदे, विजय शिंदे, यशवंत शिंदे, रमेश माने, विशाल माने, समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर सेवेकरींचा समाजतर्फे सन्मान करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचा लाभ असंख्य भक्तगणांनी घेतला. मंदिरात श्री संतसेना महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केलेले पहावयास मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta