
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्रावणमासमध्ये सकल जणांच्या सुखशांतीसाठी कोटीलिंगार्चन अनुष्ठान करण्यात आल्याची माहिती मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. श्री पुढे म्हणाले, श्री शंकराचार्य संस्थान मठात संपूर्ण श्रावणमासमध्ये कोटीलिंगार्चन अनुष्ठान करण्याची प्रथा रुढ आहे. शेकडो वर्षांपासून मठात कोटीलिंगार्चन अनुष्ठान केले जात आहे. सर्वांना सुख शांती समाधान लाभावे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, देशाला पोसणारा शेतकरी समृद्ध व्हावा. याकरिता कोटीलिंगार्चन अनुष्ठान केले जात असल्याचे श्रींनी सांगितले.
एक कोटी पार्थिवलिंग पूजन…
संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्रावणमासमध्ये मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात एक कोटी पार्थिव लिंगाचे पूजन अर्चन, विसर्जन करण्याचे कार्य संकेश्वर भागातील पुरोहितांनी केले आहे. संपूर्ण श्रावण महिनाभर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली कोटीलिंगार्चन अनुष्ठान करण्यात आले. उद्या शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी श्रावण अमावास्येला कोटीलिंगार्चन समाप्ती सोहळा होत आहे. मठात पार्थिव लिंग पूजन अर्चन आणि विसर्जनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. सर्वांनी सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta