संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-गोकाक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आपला मुलगा कु. साई अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केवळ तीन तासांत सहीसलामत घरी परतला आहे. याचे सर्व श्रेय बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी, गोकाक डीएसपी मनोजकुमार नाईक, यमकनमर्डी पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, हवालदार बी. के. नांगनुरी पोलिस कर्मचारी यांना द्यावे लागेल असे भास्कर काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, कु.साई ट्युशनहून घरी परतला नाही. तो कोठे गेला याची चौकशी करीत असतांना अपहरणकर्त्याचा काॅल आला. अपहरणकर्त्यांनी साईचे अपहरण केल्याचे सांगून पोलिसांना सांगाल तर साईचे मुंडके छाटणार असल्याची धमकी दिल्याने आम्ही चांगलेच घाबरून गेलो होतो. लागलीच संकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली. संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी वेळ न घालविता लागलीच अपहरणकर्त्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना सतर्क केले. नाका बंदी करुन शोधमोहीम सुरू केल्याने अपहरणकर्ते घाबरून गेले. त्यांनी साईला होनेहोळी फाटा येथे सोडून पळ काढला. पोलिसांच्या शोधमोहीमेमुळे साई सहीसलामत घरी परतला आहे. पोलिसांच्या कार्याला निश्चितच सलाम करावे लागेल. पोलिस अधिकारी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी बी. के. नांगनुरी, एम. जी. दादामलिक, एम. एम. जंबगी, एम. एम. करगुप्पी, बी. व्ही. हुलकुंद, वाय. एच. नदाफ, बी. टी. पाटील, बी. एस. कपरट्टी, बी. एन. मेलमट्टी, सचिन पाटील, विनोद ठक्कण्णावर यांच्या कार्याचे कौतुक करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta