Thursday , September 19 2024
Breaking News

शिवनंदा संघाने कला संस्कृती जपली : गुरुदेव हुलेपण्णावरमठ

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघाने ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक गुरुदेव हुलेपण्णावरमठ यांनी सांगितले.

संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभा मंडप येथे आयोजित कर्नाटक सांस्कृतिक महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, गुरुदेव हुलेपण्णावरमठ, प्रा. एल. व्ही. पाटील, प्रकाश अवलक्की यांचे हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करण्यात आले. गुरुदेव हुलेपण्णावरमठ पुढे म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला सुख शांती आणि समाधान मिळवून देण्याचे कार्य कला साहित्याने करुन दाखविले आहे. आपला देश विविध कला आणि संस्कृतीने नटलेला आहे. संकेश्वरातील शिवनंदा कला संघाने ग्रामीण भागातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्याचे महान कार्य चालविले आहे.

यावेळी बोलताना सेवानिवृत्त प्रा. एल. व्ही. पाटील म्हणाले, प्रत्येक व्यक्तीत कला असते. ती सादर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे कार्य शिवनंदा कला संघाने करुन दाखविले आहे. ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य सांस्कृतिक कार्यक्रमातून होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमात बाळम्माताई महिला कला बळीने लोकगीत सादर केले. दानेश्वरी कला संघाने तत्व पद तर कल्पना भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. कदळी महिला संघाने वचन गायन, स्वरसाधना संगीत पाठशाळेने शास्त्रीय संगीत, कुमारी पूर्वा गाडवी हिने भरत नाट्य, अक्कन बळगने भावगीत, काडेश बस्तवाडी यांनी वचन गायन, स्मृती बिदरी हिने लोकनृत्य, सुरेश चंदरगी यांनी हिन्दुस्तान संगीत, रुपा कडगांवी हिने भावगीतांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात कलाकारांनी शास्त्रीय संगीत,समुहगीत गायन, देश भक्ती गीते सोबान पद, राग रजनी, कर्नाटक संगीत असे विविध भरगच्च कार्यक्रमांचे सादरीकरण केले. समारोप समारंभात कन्नड साहित्य परिषदचे सुरेश हंजी यांनी लोप पावत चाललेल्या कला साहित्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी कवियत्री हमीदाबेगम देसाई, तनुजा घुगरी, सुजाता मंजरगी, अकबर सनदी, किरण नेसरी, विनोद जगजंपी, पवन कणगली, पत्रकार ए.एम कर्नाची, महंमद मोमीन, आनंद शिंदे शिवनंदा कला साहित्य आणि सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष सुरेश मंजरगी, उपाध्यक्ष एस. आर. अंमणगी, अनेक मान्यवर साहित्यप्रेमी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शिवानंद गुडाळी यांनी केले. ‌आभार सुमन पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *