Tuesday , March 3 2026
Breaking News

हुक्केरीच्या आखाड्यासाठी मातब्बरांच्या नावाची चर्चा…

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांत होत असल्याने आतापासूनच अनेक मातब्बर नेते तयारीला लागलेले दिसताहेत. हुक्केरी विधानसभा निवडणुकीत मंत्री उमेश कत्तीं विरोधात काॅंग्रेसचे माजी मंत्री ए. बी. पाटील लढत देणार असल्याची चर्चा सुरु असताना आता यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव देखील चर्चेत दिसत आहे. यमकनमर्डी येथील एका कार्यक्रमात मंत्री उमेश कत्ती यांनी सतीश जारकीहोळी यांना घरी पाठविण्याची भाषा केल्याने सतीश जारकीहोळी हुक्केरीत लढत देण्यास तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. कत्ती विरोधात जारकीहोळी बंधू असे समीकरण तयार होताना दिसत आहे. मंत्री उमेश कत्ती विरोधात आमदार रमेश जारकीहोळी यांचेतील इर्षेचे राजकारण आता चांगलेच चर्चेत दिसताहे. त्यामुळे हुक्केरी विधानसभेची निवडणूक कत्ती विरुद्ध जारकीहोळी यांच्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे दिसणार….
विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कत्ती यांच्या तिसऱ्या पिढीची एन्ट्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता युवानेते पवन कत्ती यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पवन कत्ती यांची एन्ट्री कोणत्या मतदारसंघातून होणार इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे चिरंजीव विनयगौडा पाटील हुक्केरीच्या आखाड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी किंवा कन्या प्रियांका जारकीहोळी यांची आगामी विधानसभा निवडणुकीत एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हुक्केरी, यमकनमर्डी आणि निपाणी विधानसभा मतदारसंघात नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *