Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वरात बाप्पांचे जल्लोषात स्वागत…

Spread the love

 

पारंपारिक वाद्यांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी घटली..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात विघ्नहर्ता श्री गजाननाचे संकेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे सर्वत्र जंगी स्वागत होताना दिसले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संकेश्वरातील गणेश भक्तांना बाप्पांचे जंगी स्वागत करता आले नाही. त्यामुळे यंदा गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसून आला. संकेश्वर पोलिस ठाण्यात गणेशोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या शांतता सभेतील सर्व शासकीय नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा होतांना दिसला.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव..
संकेश्वरातील गणेश भक्तांनी बाप्पांचा उत्सव पर्यावरण पूरक करुन आदर्श निर्माण करण्याचे कार्य करुन दाखविले आहे. संकेश्वरात प्रथमच बाप्पांच्या आगमन प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी मोठ्या स्वरुपात घटलेली पहावयास मिळाली. जादातर लोकांनी फटाक्यांना फाटा देवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायांचे आगमन केले. त्याचबरोबर बऱ्याच गणेश भक्तांनी ॲटोरिक्षा, दुचाकी चारचाकी, वाहनातून शांततेने गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायांना निवासस्थानी आणतानाचे चित्र पहावयास मिळाले. संकेश्वर पोलिसांनी ठाण्यात बाप्पांचे जंगी स्वागत केले.

नो डिजे… ओन्ली हलगीचा निनाद…

घरातील गणेश मूर्ती असो, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्तीचे आगमन पारंपारिक वाद्यांच्या गजरात होतांना दिसले. जादात्तर लोकांनी हलगीच्या निनादाला प्राधान्य दिलेले पहावयास मिळाले. हलगीच्या तालावर मंडळाचे कार्यकर्ते नृत्यात रहमान दिसले. गावात कोठेच डिजेचा आवाज ऐकावयास मिळाला नाही.

कृष्णा मेडिकल कॉलेजची भव्य मिरवणूक...

येथील कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली गणेश मूर्ती आणून ढोल वादनाच्या गजरात बाप्पांचे जंगी स्वागत केले. मिरवणुकीत मेडिकल विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात शानदार नृत्याविष्कार सादर केला. मिरवणुकीत काॅलेजचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश करजगी, सेक्रेटरी डॉ. संतोष खज्जण्णावर यांचेसह प्राचार्य प्राध्यापक देखील सहभागी झाले होते. परीट गल्लीतील अभिजित माने, अक्षय माने यांनी आपल्या घरातील श्री गणरायांचे विघ्नहर्ता ढोल ताशा पथकाच्या गजरात आगमन केले. तर पारंपरिक पद्धतीने गणरायांचे आगमन डॉ. मंदार हावळ, डॉ. प्रितम हावळ, डॉ. स्मृती हावळ यांचे बरोबर श्रीराम सेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांचेसह बऱ्याच भक्तगणांनी केलेले पहावयास मिळाले.

फटाक्यांच्या आतषबाजीत निलगार गणपतीचे आगमन…

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे तुफान फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन होतांना दिसले. मिरवणूक मार्गात निलगार गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. गणपती बाप्पा मोरया,चा जयघोष आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निलगार गणपतीचे जंगी स्वागत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *