Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला २३ लाख रुपये नफा, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची १०८ वी सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उद्देशून बोलताना संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी म्हणाले, आमच्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला चालू आर्थिक वर्षात २३ लाख ६८ हजार ८० रुपये नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देत आहोत. संघाने शतकमहोत्सवी वर्षांत यशस्वीरित्या वाटचाल करतांना सभासदांना बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मिळणाऱ्या सर्व सवलती मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे. सभासदांच्या विश्वासावर संघाची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत रमेश भरमण्णावर (सीईओ) यांनी केले. त्यांनीच अहवाल वाचन करुन सभासदांच्या संकांचे निरसन केले. सभेत शिवानंद शिरकोळी, बाबूराव मरीगुद्दी तसेच कांही सभासदांनी आपले विचार मांडले.

सभेला व्हा.चेअरमन अण्णासाहेब पाटील, संचालक अप्पासाहेब पाटील, दुंडप्पा बोरगली, रुद्रप्पा दुंडगे, जितेंद्र मरडी, मारुती गस्ती, राजू कोळी, श्रीमती सुवर्णा देवरक्की, हेमलता सदाशिव शेट्टीमनी, बाबूराव नलवडे, महादेव केसरकर शंकरराव हेगडे, बाबासाहेब इंगळे, सभासद उपस्थित होते. आभार रमेश भरमण्णावर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *