
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. सचिन पाटील यांच्या विहिरीत आढळून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याचे नाव बसवराज शंकर कुराडे (वय ३८) राहणार बेळगांव असे असून तो निपाणी येथील एका बारमध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे.
संकेश्वर पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, संकेश्वर बायपास रस्त्या लगत डॉ. सचिन पाटील यांच्या शेतवाडीतील विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आहे. पोलिस चौकशीतून सदर व्यक्तीचे नाव बसवराज शंकर कुराडे (वय ३८) राहणार बेळगांव असल्याचे समजले आहे. बसवराज हा निपाणी येथील एका बारमध्ये कामाला होता. कौटुंबिक भांडणाच्या त्रासाला कंटाळून दारुच्या नशेत त्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta