
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाचा महादासोह सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादासोह सोहळ्याची सुरुवात श्रीमन्निरंजन. जगद्गुरू श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगीच्या उत्सव मूर्तीच्या पालखी महोत्सवाने करण्यात आली. प्रसाद पूजा मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी केली.
यावेळी कोडीमठाचे डॉ. शिवानंद राजयोगेंद्र महास्वामीजी, डॉ. मल्लीकार्जुन महास्वामीजी आणि अन्य मठाधिश तसेच माजी मंत्री ए. बी. पाटील, युवानेते पृथ्वी कत्ती, प्रकाश कणगली, निरंजन पाटील, रायप्पा निंगनुरी, सातप्पा कारदगी, राजू यरगट्टी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगीच्या उत्सव मूर्तीची फुलांनी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. भक्तगणांनी देवदर्शनाबरोबर श्रींचा आर्शीवाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


![]()
Belgaum Varta Belgaum Varta