संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी संगोळ्ळी रायन्ना सर्कल येथे हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूट बेळगांव आणि उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष शंकर हालप्पा हेगडे म्हणाले, हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या आकस्मिक निधनाने राज्याचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. ते हुक्केरी विधानसभा मतक्षेत्रातून सातत्याने आठ वेळा आमदार आणि चार वेळा मंत्रीपद भूषविले होते. उमेश कत्ती सावकारांनी मतदारसंघात भरीव अशी विकास कामे केली आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने हुक्केरी मतक्षेत्रातील लोकांना मोठा आघात झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल चंदरगी, दस्तगीर जमादार, मधुकर कुलकर्णी, नागौडा आलप्पा पुजारी, यलाप्पा हेगडे, सुनिल नागौडा कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta