Tuesday , March 3 2026
Breaking News

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्याचे निवेदन

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पालिकेने नेटकी व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी राजशेखर चौगला यांना देण्यात आले आहे. निवेदनात हिरण्यकेशी नदीकाठावर सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे व्यवस्थितपणे विसर्जन करता यावे याकरिता थरपाची सोय करावी. श्री मूर्तींचे पाण्यांत विसर्जन करण्यासाठी प्लास्टिक बॅरेलने तयार केलेले थरप उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर विसर्जन ठिकाणी मोठ्या फोकस लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी आर. सी. चौगला यांना मागणीचे निवेदन सादर करताना महेश दवडते, शिवपूत्र आरभांवी, चंद्रकांत हलगडगी, शिवाजी खाडे, मारुती भिसूरे, संदिप देसाई, रुतिक भोसले, युवराज कदम, राजू मनवाडे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *