
फटाक्यांची आतषबाजी आणि मोरयाच्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन..
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुखवटा पाळून शांततामय वातावरणात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत नो डाॅल्बी, नो डिजे, ओन्ली फटाक्यांची आताषबाजी आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार चाललेला दिसला गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने काढून श्री गणेश मूर्तीचे हिरण्यकेशी नदीत विसर्जन करण्यात आले. संकेश्वरात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साध्यासुध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी हलते देखावे, जीवंत देखावे, विद्युत दिव्यांचा झगमगाट पाण्याचे आकर्षक कारंजे या गोष्टींना फाटा देऊन बाप्पांची आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापना करुन उत्सव साजरा केलेला दिसला. बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करुन भक्तगणांना महाप्रसादाचा लाभ मिळवून दिला.
विसर्जनचा पहिला मान अंकली वेस मंडळाला..
संकेश्वर अंकले वेस येथील श्री हनुमान तरुण मंडळाच्या श्री गणेश उत्सव मंडळांने यंदा गणेश मूर्ती विसर्जनाचा पहिला मान पटकाविला. या मंडळाची विसर्जन मिरवणूक ठिक ४ वाजता सुरू झाली. फटाक्याची आताषबाजी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर जयजयकारात मिरवणूक पुढे सरकताना दिसली. सायंकाळी ५.४५ वाजता अंकले वेस मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचे हिरण्यकेशी नदीत विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी मंडळाचे जयवंत करीगार, अशोक पाटील, संजय जोंधळे, दत्तात्रय थोरवत, पिराजी यादव, शुभम पत्तारे, दीपक जोंधळे, अनिल यादव, संदिप पागे, उमेश खामकर, संतोष जाधव, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta