Tuesday , March 3 2026
Breaking News

वल्लभगडात कँडल मार्चने यु.के.ना श्रध्दांजली

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर आणि वल्लभडात उमेशअण्णा अमर रहेच्या जयघोषात हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना कॅंडल मार्चने श्रध्दांजली वाहण्यात आली. यु.के. अक्षरा सभोवतीच्या मेणबतीच्या प्रकाशात उमेश अण्णांच्या आठवणी जागविण्यात आल्या. हरगापूर आणि गडवासियांनी हातात पेटत्या मेणबत्ती घेऊन कॅंडल मार्चने कत्तींना श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना पवन पाटील म्हणाले, आम्हा सर्वांचे लाडके नेते हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेशअण्णांच्या आकस्मिक निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. उमेश अण्णांनी हरगापूर ग्रामपंचायतला विकास निधी मिळवून देऊन ‌अनेक विविध विकास कामे करुन दाखविली आहेत. हरगापूर येथे कॅंडल मार्चचे आयोजन गजानन युवक मंडळातर्फे तर वल्लभगडात कँडल मार्चचे आयोजन सिध्देश्वर युवक मंडळाकडून करण्यात आले होते. कॅंडल मार्चमध्ये मल्लीकार्जुन वठारे, अण्णासाहेब पाटील, प्रकाश हालट्टी, एल. एम. पाटील, राजू पाटील, दुरदुंडी उगारे, संजय पोवार, विजय साळुंखे ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *