Tuesday , September 17 2024
Breaking News

उमेश अण्णांचे स्वप्न साकार व्हावे : राजेंद्र पाटील

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या विकास कामांचे स्वप्न साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

ते संकेश्वर समस्त नागरिकांच्या वतीने आयोजित दिवंगत उमेश कत्ती श्रध्दांजली सभेत बोलत होते. येथील एपीएमसी आवारात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, शिक्षक राजु कमतेसह अनेक मान्यवरांनी उमेश अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजेंद्र पाटील पुढे म्हणाले, उमेश अण्णांच्या जाण्याने हुक्केरी विधानसभा मतदारसंघ पोरका अनाथ झाला आहे. उमेश अण्णांनी हिडकल डॅम येथे उद्यान काशी निर्माणचे काम हाती घेतले होते. त्याचबरोबर मतदारसंघात अनेक विकास कामे राबविण्याचा संकल्प केला होता. भाजपाच्या नेते मंडळींनी तसेच राज्यातील बसवराज बोम्माई सरकारने कत्ती परिवारातील लोकांशी विचारविनिमय करून त्यांना स्थानमान देण्याबरोबर उमेश अण्णांच्या विकासकामाला चालना मिळवून देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगितले.
एपीएमसीच्या ते राणी चन्नम्मा सर्कल दरम्यान कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

भरपावसात कॅंडल मार्च…
हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना कॅंडल मार्चने श्रध्दांजली वाहण्यात आली. एपीएमसी येथून कॅंडल मार्चची सुरुवात होताच पावसानेही हजेरी लावली.त्यामुळे मेणबत्ती ऐवजी मोबाईल टार्चच्या प्रकाशात कँडल मार्च चाललेले दिसले. राणी चन्नम्मा सर्कल येथे “उमेश अण्णा अमर रहे”च्या जयघोषात श्रध्दांजली वाहण्यात आली. श्रद्धांजली सभेत आणि कॅंडल मार्चमध्ये संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, हिरण्यकेशीचे संचालक प्रभुगौडा पाटील, शिवनायक नाईक, शिवानंद नेसरी, के. बी. पाटील, प्रशांत पाटील, सुरेश हुंच्याळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, नंदू मुडशी, डॉ. मंदार हावळ, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, पवन पाटील, नागेश क्वळी, राजेश गायकवाड, पुष्पराज माने, दिनेश कोळेकर, प्रदीप माणगांवी, अभिजित कुरणकर, संदिप दवडते, संदिप गंजी अनेक मान्यवर अभिमानी चाहते सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *