Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर नागरिक मंचतर्फे छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांचा सन्मान…

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांना हंम्पी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने संकेश्वर नागरिक मंचतर्फे त्यांचा नुकताच शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, राघवेंद्र देवगोजी यांची फोटोग्राफी निश्चितच कौतुकास्पद राहिली आहे. ते एक उत्तम छायाचित्रकार असून त्यांची फोटोग्राफी लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे. नुकतीच हंम्पी येथे राष्ट्र स्तरीय लॅंडस्केप फोटोग्राफी स्पर्धा पार पडली. यामध्ये आमच्या संकेश्वरचे छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांनी सहभागी होऊन पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवून संंकेश्वरचे नाव उज्ज्वल केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नागरिक मंचचे पुष्पराज माने, किर्तीकुमार संघवी, सदा कब्बूरी, रमेश पुजारी, पुरुषोत्तम पेंडसे, मंचचे सभासद उपस्थित होते. संकेश्वरात सर्वत्र राघवेंद्र देवगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *