
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था सभासदांचे प्रेम आणि उदंड सहकार्यातून २३ व्या वर्षांत यशस्वी पदार्पण करत असल्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, संस्थेचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले.
ते संकेश्वर सौहार्दच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, संकेश्वर सौहार्दचे संस्थापक मधुकर नलवडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दिवंगत नेते आणि संस्थेचे दिवंगत सभासद यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत अक्षय कदम यांनी केले. अहवाल वाचन विजय बोटे (सीईओ) यांनी केले. अमर नलवडे पुढे म्हणाले संकेश्वर सौहार्दला चालू आर्थिक वर्षात ५० लाख ५२ हजार ८०० रुपये नफा झाला आहे.सभासदांना २०% लाभांस देत आहोत. सभासदांच्या मागणीची दखल घेऊन पुढच्या वर्षी सभासदांना २५% लाभांश दिले जाणार असल्याचे सांगून त्यांनी दिवंगत उमेश कत्ती यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत जयप्रकाश सावंत यांनी संकेश्वर सौहार्दच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी गुणवंत विद्यार्थी अभय दत्ता शिंदे याचा सत्कार करण्यात आला.
सभेला संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित कुरणकर, संचालक कृष्णा सुगंधी, जयप्रकाश खाडे, श्रीकांत परीट, बसगौडा पाटील, रविंद्र कांबळे, झाकीर बेटगिरी, महादेव क्षिरसागर, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन कुमार किंवडा यांनी केले. आभार व्ही बी पोवार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta