Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सौहार्दला १ कोटी २२ लाख रुपये नफा, सभासदांना २५% लाभांश जाहीर..

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १ कोटी २२ लाख ५२३ रुपये नफा झाला असून सभासदांना २५ टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवानंद जी. संसुध्दी यांनी सांगितले. ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत मंत्री उमेश कत्तीं यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत अमर जरळी (सीईओ) यांनी केले. अहवाल वाचन सुरेश काकोळी यांनी केले. संस्थेचे सेवानिवृत्त कॅशिअर आलप्पा मिर्जी आणि ज्येष्ठ सभासदांचा सन्मान माजी अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, विद्यमान अध्यक्ष शिवानंद संसुध्दी यांच्या हस्ते करण्यात आला.
शिवानंद संसुध्दी पुढे म्हणाले संस्थेच्या कर्मचारी वर्गाने कर्जाच्या वसुलीचे कार्य जोमात चालविल्यामुळे नफ्यात वृध्दी झाली आहे. थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात वसुलीचे काम थोडे थंडावले होते. आता वसुली होत आहे.यावेळी सभासद बाबूराव मरीगुद्दी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे अध्यक्षांनी निरसन केले.

संकेश्वरात श्री दुरदुंडीश्वर सौहार्द नंबर वन…
संकेश्वरातील सौहार्द सहकारी संस्थांत सर्वाधिक नफा दुरदुंडीश्वर सौहार्दने मिळवून नंबर वन स्थान पटकाविले आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रात दुरदुंडीश्वर सौहार्दची चर्चा होताना दिसत आहे. सभेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पर्वतराव, संचालक अप्पासाहेब शिरकोळी, दुंडाप्पा गाडवी, प्रकाश कणगली, प्रकाश नेसरी, सोमशेखर पचंडी, शंकर बागलकोटी, मारुती हेगडे, शंकर क्वळी, सुलोचना सुनदाळी, शैला शिरकोळी, ललिना रायण्णावर, संजिव गस्ती, सलहा समिती सदस्य आनंद शिरकोळी, सुनिल पर्वतराव, विनोद संसुध्दी,सभासद बाबूराव मरीगुद्दी, बसवराज बस्तवाडी, राजेंद्र कणगली, राजू मुंजण्णावर अन्य सभासद उपस्थित होते. आभार अमर जरळी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *