संकेश्वर (महंमद मोमीन) : डॉक्टरांचा उजवा हात म्हणून फार्मासिस्ट (औषध विक्रेते) यांना ओळखले जाते. फार्मासिस्टचे काम जबाबदारीचे जोखमीचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ यांनी सांगितले. ते संकेश्वर फार्मसी डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर औषध विक्रेता संघातर्फे फार्मसी डे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात डॉ. नंदकुमार हावळ यांचा सत्कार निजलिंगप्पा दड्डी यांचे हस्ते करण्यात आला.
डाॅ. नंदकुमार हावळ पुढे म्हणाले, कोरोना काळात संकेश्वर औषध विक्रेत्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. औषधांची एक्सपायरी तपासून जबाबदारीपूर्वक कार्य करायला हवे असल्याचे सांगितले. उपस्थितांचे स्वागत संकेश्वर औषध संघटनेचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी यांनी केले. यावेळी किरण किंवडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संकेश्वर औषध विक्रेते संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश सावंत, सेक्रेटरी रामचंद्र किल्लेदार, गिरीश गड्डी,अरुण किल्लेदार, अस्लम मुल्ला, मल्लीकार्जुन नवनी, मयूर पाटील, महांतेश नांगनुरी, सलीम बारगिर, फयाज मालदार, राहुल पाटील, नुपूर तंबद, संतोष अक्कतंगेरहाळ, राजू कब्बूरी, संघटनेचे सभासद उपस्थित होते. आभार जयप्रकाश सावंत यांनी मानले.
