Monday , September 21 2026
Breaking News

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार; आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

Spread the love
तेहरान : इराणमध्ये हिजाब व्यवस्थित न घातल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यापासून मोठे आंदोलन पेटले आहे. महिलांकडून हिजाबला विरोध केला जात आहे. आंदोलनाला १० दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची आग अधिकच भडकली आहे. या तरुणीचं नाव हदीस नजफी असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिच्या डोक्यामध्ये आणि मानेवर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. मृत्यूनंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, हिजाबविरोधात लोकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषामुळे आंदोलन अधिकाधिक भडकत चालले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांकडून बलप्रयोग केला जात आहे. इराणमध्ये जागोजागी होत असलेल्या आंदोलनांमधून महिला हिजाबला आग लावताना दिसत आहेत. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मार केला जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार या गोळीबारात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्वतंत्र संस्थांच्या अंदाजानुसार या गोळीबारात किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *