Tuesday , June 2 2026
Breaking News

हिमाचल प्रदेशमधून टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 7 ठार

Spread the love

 

कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ हा अपघात झाला आहे. एक टेम्पो ट्रॅव्हलर व्हॅन रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दरीत कोसळली.
या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर आहे. 5 जखमींना कुल्लूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, 5 जखमींवर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 7 मृतदेह ताब्यात घेतले आहे. वाराणसीमधील महाविद्यालयातील विद्यार्थी हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी आले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव कर्मचारी वेळेवर पोहोचले. दरीत उतरून 7 पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नीटची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार

Spread the love  नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे २०२६ रोजीची नीट यूजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *