संकेश्वर (महंमद मोमीन) : यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, युवानेते राहुल जारकीहोळी हे दुबई प्रवास दौऱ्यावर आहेत. दुबई येथे जारकीहोळी पिता-पुत्राचे चाहत्यांकडून सहर्ष स्वागत करण्यात आले. सतीश जारकीहोळी यांनी दुबई येथील गुलाब कुतबुद्दीन कुमनाळी यांच्या मुतेल्हा शारजाह युनायटेड आमिराती येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गुलाब कुमनाळी परिवाराने आमदार सतीश जारकीहोळी, युवानेते राहुल जारकीहोळी यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. भेटीदरम्यान सतीश जारकीहोळी यांनी गुलाब यांचेकडून दुबईस्थित भारतीयांच्या कामाची माहिती घेतली. दुबईत आपले असंख्य चाहते असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. दुबई येथे चाहत्यांना भेटून अत्यानंद झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सतीश जारकीहोळी यांचेसमवेत डॉ. बसवराज घोडगेरी, राजेंद्र हुलकट्टी, उपस्थित होते. आमदार सतीश जारकीहोळी यांचे स्वागत गुलाब कुमनाळी यांनी केले. राहुल जारकीहोळी यांचे स्वागत सारा, असना इबा यांनी केले. यावेळी झिनत गुलाब कुमनाळी, मोहसिन खोजा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta