संकेश्वर (महंमद मोमीन) : सायकलवरून “निसर्ग वाचवा” चा संदेश घेऊन मंगळूर ते काश्मीर प्रवास दौऱ्यावर निघालेले सायकलपटू श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार यांचे संकेश्वरात हाॅटेल मालक संघ आणि वंदे मातरम् योग केंद्रातर्फे सुधाकर शेट्टी यांनी सहर्ष स्वागत केले.
यावेळी बोलताना सुधाकर शेट्टी म्हणाले, श्रीनिधी शेट्टी, जगदीश कोलार हे निसर्ग वाचवा, देहदान करा, योग करा निरोगी व्हा. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगळूर ते काश्मीर सायकलवरून प्रवास दौऱ्यावर निघाले आहेत. संकेश्वरकरांच्या वतीने आपण त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या सायकल प्रवास दौऱ्याला कर्नाटक राज्य भाजपाचे अध्यक्ष नलिनकुमार कटील, मंत्री सुनिलकुमार, वेदव्यास कामत यांनी चालना देऊन सदिच्छा प्रदान केल्या आहेत. त्यांचा मंगळूर ते काश्मीर साडेतीन हजार कि.मी. अंतर सायकलवरील प्रवास यशस्वी होऊदे अशा शुभेच्छा आपण त्यांना प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवीप्रसाद शेट्टी, राघवेंद्र देशपांडे, हिरा रायका, संतोष मंजू शेट्टी, सागर सुतार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta