संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात सोयाबीन काढणी मळणीच्या कामाची धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र सोयाबीन काढणी मळणीचे काम सुरू झाल्याने शेतमजूरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. शेतमालकांना सोयाबीन काढणी मळणीसाठी शेतमजुरांची मनधरणी करावी लागत आहे. शेतमजूरांच्या मागण्या वाढल्याने शेतकरी, शेतमालक डोक्याला हात लावून बसलेले दिसत आहेत. शेतमजूर सांगताहेत नाईंटी वाईंन देणार असाल तर सोयाबीन काढणी मळणी कामाला येतो. पगार चारशे रुपये, नाष्टा हवा. किरकिर करायची नाही. मान्य असेल तर बोला. महिला शेतमजुरांना देखील चारशे रुपये पगार द्यावे लागत आहे. कांही ठेकेदार सोयाबीन काढणी मळणी कामाचा ठेका एकरी ३ ते ४ हजार रुपयाला घेताहेत. सोयाबीन मळणीसाठी मशीन मालकाला प्रति ६० किलो मळणीसाठी २५० रुपये मोजावे लागत आहेत. अधुनमधून बरसणारा पाऊस शेतमजुरांना लाभदायक ठरलेला दिसत आहे. कारण त्यांच्या मागण्या शेतमालकांना मान्य करणे भाग पडत आहे. एकरी सोयाबीनचे उत्पादन २ ते ४ क्विंटल मात्र दिसत आहे. सोयाबीनचा एकंदरीत खर्चाचा विचार करता सोयाबीन पीक शेतकऱ्यांना चांगलेच महागात पडलेले दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta