संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मुस्लिम बांधवांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती, ईद मिलादुन्बी उत्साही वातावरणात जल्लोषात साजरी केली. ईद-मिलाद निमित्त जुम्मा मशीद येथून गावातील प्रमुख मार्गे जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत सुन्नत जमात तंजिम कमिटी, महेदि (मोमीन) समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुलूसमध्ये पैगंबरांचा (नारा) जयोघोष चाललेला दिसला. जुलूसमध्ये कव्वालीच्या ठेक्यावर मुले युवक नृत्यात रममान दिसले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांकडून जुलूसमध्ये सहभागी मुला-मुलींना लोकांना जिलेबी, बालूशाह, दूध, सरबत वाटप करण्यात आले. मिरवणुकीत इस्लामी झेंडे, पताके डौलाने फडकतांना दिसले.
मिरवणुकीत लक्षवेधी तिरंगा…
ईद-मिलाद जुलूस (मिरवणुकीत) इस्लामी झेंडे बरोबर तिरंगा ध्वज सर्वांचे लक्ष केंद्रित करतांना दिसले. मुस्लिम बांधवांनी जुलूसच्या अग्रभागी तिरंगा ध्वज डौलाने फडकावित देशाभिमान जागविलेला दिसला. मिरवणुकीत हाजी हुसैन मोकाशी, हाजी महंमद हुसैन गडंमफल्ली हाजी इलियास मुल्ला, हाजी मैनोद्दिन कारेकाजी, नासीर जमादार, मुक्तार नदाफ, परवेज सोलापूरे, मुर्तजा मोमीन, झाकीर मोमीन, मोहसिन पठाण, मुस्तफा मकांनदार, नबीसाहेब हुंचाळकर, हारुण मुल्ला, महंमदरेजा सोलापूरकर, रशीद नन्नूबाई,अन्वर मुल्ला, नासीर जमादार, अस्लम मुल्ला, बाबासाहेब नांगनूरे, शौकत मालदार, सुन्नत जमात तंजिम कमिटीचे सदस्य, महेदि जमातचे सदस्य मुले-मुली, युवक मुस्लिम बांधव, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta