Tuesday , September 17 2024
Breaking News

संकेश्वरच्या शिवभक्ताचा रायगडावर मृत्यू

Spread the love

 

रायगड (नरेश पाटील) : 2 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवर मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर (जि. बेळगाव) येथील 22 वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक खाली कोसळला, मात्र त्यातच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. तो खास शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संकेश्वर येथून आला होता. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.
रायगडाच्या पायऱ्या चढत असतानाच शिवभक्त असलेला युवा मावळा अचानक खाली कोसळला. या दुर्घटनेनंतर त्याला तात्काळ जवळच्या पाचाड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे शिवभक्तांमधून व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा किल्ले रायगडावर आपल्या मित्रांसोबत आला होता. गडाच्या पायऱ्या चढत असताना त्याला त्रास जाणवू लागला. त्याला प्रथम मदत केंद्र आणि नंतर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे अद्याप समजू शकले नाही. हा युवक नेमका कोणत्या कारणामुळे खाली कोसळला याचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. त्याला अचानक हृदयविकाराचा झटका की उष्माघातामुळे हे अद्याप समजू शकलेले नाही. थकवा आल्यामुळे किल्ले रायगडावर आलेल्या शिवप्रेमींना उष्माघाताचा भयंकर त्रास झाला.
मात्र अनेक शिवभक्तांना रोपवेचे तिकीट काढून सुद्धा रोप-वे ने जाता आले नाही. आलेले मंत्री, त्यांचे अंगरक्षक, पोलीस यांनाच रोपे वे मधून जाता आले. यामुळे शिवभक्तांमधून रोप-वेच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *