Sunday , July 26 2026
Breaking News

ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी

Spread the love

 

नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा येथील शालिमार स्टेशनवरून चेन्नईला रवाना झाला होती. आज (२ जून ) ओडिशातील बहनागा स्टेशनजवळ आल्यावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरा-समोर आली. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून खाली घसरले. ही माहिती मिळताच बचावकार्यचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं.

स्थानिकांच्या मदतीने पथकांकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेरूळ रिकामा करण्याचं काम सुरु आहे. ५० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीचएसी, खांतपाडा पीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *