Sunday , December 7 2025
Breaking News

6 लाखाच्या गांजासह दोन आरोपींना अटक

Spread the love

 

संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल नाक्याजवळील हंचीनाळ गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे गांजा विक्री करताना महाराष्ट्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. बेळगाव डीसीआरबी शाखेचे डीएसपी विरेश दोडमनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशन बेळगावचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व बेळगाव डीसीआरबी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. साहेबराव विश्वनाथ पलीके, वय 50 वर्षे, राहणार हळदाईवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आणि पुरुषोत्तम रामचंद्र कौलगी वय ४२ वर्षे, राहणार पंढरपूर, जिल्हा सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक केलेल्यांकडून सुमारे 6,00,000/- किमतीचा 4 किलो 180 ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बेळगाव जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, डीसीआरबीचे एएसआय टी के कोळची, ए एन मसरगुप्पी, व्ही व्ही गायकवाड आणि जिल्हा सीईएन गुन्हे पोलीस स्टेशनचे कर्मचारी एस ए बेवनूर, एन आर घाडेप्पनवर, एल वाय किलारगी यांनी सहभाग घेऊन आरोपींना पकडण्यात यश मिळविले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *