दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा हायस्कूल येथे वाढदिवसानिमित्त वह्या वाटप करण्यात आल्या.
विधी विना गती गेली, गती विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शुभ्र खचले इतके सारे अनर्थ एका अविज्ञेने केले आहे. आपल्याला ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगला अभ्यास केला पाहिजे. यासाठी आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी व्हाल, असे विचार माजी मुख्याध्यापक सीताराम पाटील यांनी मांडले.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सीताराम पाटील हे होते.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे गव्हर्नमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर उदय पाटील व मान्यवराच्या हस्ते पुष्पहार घालून फोटो पूजन करण्यात आले. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या स्फूर्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक बी. व्ही. पेडणेकर यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.
उदय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आठवी, नववी, दहावी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य यल्लाप्पा पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य तानाजी सुंडकर. प्राथमिक मराठी मुलांची शाळा एसडीएमसी अध्यक्ष शिवाजी बुवा, व्ही. एम. हुद्दार, ए. जे. खांडेकर, अर्जुन पाटील, मारुती पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. के. पाटील यांनी केले तर ए. पी. पाटील मॅडम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta