संकेश्वर : येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने तीन इच्छुकांनी एकूण चार उमेदवारी अर्ज शुक्रवारी पालिका कार्यालयात निवडणूक अधिकारी ए. एच. जमखंडी यांच्याकडे दाखल केले. काँग्रेस नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून आज उमेदवारी अर्ज करण्यात श्रीमती भारती जितेंद्र मर्डी २, ऍड. विक्रम परशराम करणिंग १, गंगाराम गणपती भुसगोळ १ अशा तीन उमेदवारांनी एकूण ४ अर्ज दाखल केले आहेत.