संकेश्वर : दिनांक २४ शंकराचार्य पीठातील शंकरलिंग मंदिरात स्टोन वॉशिंगने स्वच्छतेचे काम मठाधिपती श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात सुरू आहे. इ. स. १२२२ मध्ये “रट्ट” काळात “जखनाचार्य” यांनी बांधलेले मुख्य शंकरलिंग मंदिर “हेमांडपथी” रचनेचे असून इ. स. १४९९ मध्ये यावर “शंकराचार्य पिठाची परंपरा” सुरू झाली. पीठातीलशंकरलिंग मंदिर काळ्या पाषाणातील कोरीव नक्षीकाम केलेले खांब नगारखाना गोपूर नागमंडप छतावर कोरलेल्या नागमूर्ति व अर्ध मंडपास पूर्वी चुना हुरमंज रंगकाम केल्याने त्यावर “थर” बसून कोरीव शिल्पकला झाकोळे झाली होती. गत महिन्यापासून मायाक्कादेवी स्टोन वर्क्स (बंगलोर /सिंदगी) यांनी कामाचा ठेका घेऊन कॉम्प्रेशन मशीनच्या सहाय्याने वाळू व हवा मिश्रित करून मंदिरातील दगडी शिल्पकला बांधकामावर कॉम्प्रेसर मशीन ने सप्रेची फवारणी करून स्वच्छता करीत आहे परिणामी कोरीव नक्षीकाम आता लक्ष वेधून शिल्प ठळकपणे उठून दिसत आहे यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली असून “मुर्डेश्वर” येथील दगडाचा वापर करून मारुती मंदिरात सभामंडप व आकर्षक प्रवेशद्वार कोरीव काम करून उभारले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta