बेळगाव : शिक्षण खात्यातील अधिकारी परशराम कोलेकर याना प्रामाणिक कार्य केल्यामुळे बढती मिळाली असून पुढील काळात देखील अशाच प्रकारे सेवा बजावून सर्वांसमोर आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी केले आहे.
परशराम कोलेकर यांची हलीयाळ येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात गॅझेटेड मॅनेजरपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत
खानापूर तालुका संघटनेतर्फे रविवारी गोंधळी गल्ली येथे कोलेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कुशकुमार देसाई यांनी कोलेकर यांनी खानापूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालय, बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय व डायट केंद्र येथे एफडीए अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा बजावली आहे. शिक्षकांच्या समस्या लवकर सुटाव्यात यासाठी त्यांचे प्रयत्न असतात गॅझेटेड मॅनेजर म्हणून बढती मिळाल्याने शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी त्याचे निवारण करावे असे मत व्यक्त केले
संघटनेचे माजी अध्यक्ष पी जे घाडी, सचिव सुरेश कळलेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष सुहास शहापूरकर, मिलिंद देसाई, नामदेव कोलेकर, गणपती गुरव,
परशुराम पाटील, राजाराम गुरव, नामदेव कोलेकर, दत्ताराम पाटील, विजयालक्ष्मी कोलेकर, एकता कोलेकर, वैष्णवी कोलेकर, अक्षय कोलेकर आदी उपस्थित होते.